Saturday, January 15, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे पत्रक जारी प्रवेशपत्र नसल्यास मिळणार नाही प्रवेश !



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी mpsc ने नवे प्रसिद्धी पत्रक जारी  केले आहे .

या नव्या प्रसिद्धी पत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी आवश्यक असणार्या प्रवेश पत्राबाबत विविध नव्या सूचना आयोगाने जारी केल्या आहेत .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या अनुषंगाने जारी केलेल्या  प्रसिद्धी पत्रकामधील नव्या सूचना खालीलनुसार -




या  प्रसिद्धी पत्रकानुसार महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ०२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली होती व सुधारित वेळापत्रकानुसार हि परीक्षा आता २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे .
२.आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे या आधी जारी  करण्यात आलेले प्रवेशपत्राच्या  आधारे परीक्षार्थीला नियोजित परीक्षा स्थळावर प्रवेश देण्यात येईल .


३.यासोबतच वयाची कमाल मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या देण्यात आलेल्या संधीनुसार संबंधित उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत .
४.प्रवेशपत्रा शिवाय प्रवेश दिला जाणार नाही .
  


No comments:

Post a Comment