चालू घडामोडी दिनांक 4 जानेवारी 2022
१.राज्यातील 1.12कोटी शेतकरी हे पीएम किसान योजनेचे लाभार्थी ठरले आहेत.यामध्ये अहमदनगर सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
२.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज हृदयविकार झटक्याने दुःखद निधन झाले .अनाथ मुलांसाठी ,त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले.त्यांना 2021 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
३. यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस चा देशातील वापर विक्रमी पातळीवर पोहचला आहे.याद्वारे डिसेंबर 2021 मध्ये 456 कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.
४.देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अनेक शहरांमधील व्यवरावर परिणाम होऊ लागला आहे सिएमाई या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारी चा दर 7.9 टक्क्यांवर पोहचला आहे
५.सलवाटोर गरड या इटालियन कलाकाराने अदृश्य शिल्पाची विक्री 18000 डॉलर्स मध्ये विकले आहे.यापूर्वी देखील त्याने अशे शिल्प विकले होते
No comments:
Post a Comment