##इतिहासात एकदा-
*1 मार्च -आज इस्राईलचे माजी पंतप्रधान इतजैक राबिन यांना मरणोत्तर नोबल शांती (1995)पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1.कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास आजपासून सुरुवात होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
2.चीन बरोबरच्या निर्यातीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार मागील वर्षी चीनला भारताने 20.87अब्ज डॉलरची निर्यात केली आहे.2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भरताद्वारे चीनला होणाऱ्या निर्यातीमध्ये 16.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
3.CBDT च्या अध्यक्षपदी प्रमोदचंद्र मोदी याना 3 महिन्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.28 फेब्रुवारी रोजी प्रमोडचंद्र मोदी यांची अध्यक्षपदाची मुदत संपत होती,मात्र केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मोदी यांना कायम ठेवत 3 महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता .ह्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी देत मोदी यांना 3 महिने कार्यकाळ वाढून देण्यात आला आहे.
4.भारतातील सर्वात जास्त cctv कॅमेरे असणारे तुरुंग असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश अग्रस्थानी,तर गुजरात व महाराष्ट्रास अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळाले आहे.
Cctv कॅमेरे असणारे राज्ये खालीलप्रमाणे-
1.उत्तर प्रदेश-2757
2.गुजरात-2314
3.महाराष्ट्र-1580
4.राजस्थान-1529
5.ओडिशा-1520
6.गोवा-17
7.पडूचेरी-8
8.सिक्कीम-2
लोकसभेमध्ये ही माहिती सादर करण्यात आली आहे.
5.आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून इस्रोने पीएसएलवी द्वारे 19 उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठवले आहेत.इस्रोची ही पहिलीच व्यवसायीक मोहीम होती.
या उपग्रहांमध्ये अमेरिकेच्या 13 उपग्रहांचा समावेश होता.
ब्राझीलचा अमेझॉनिया या उपग्रहाचा यात समावेश होता.
चेन्नई येथील स्पेस किड्स इंडीया चा सतीश धवन नावाच्या उपग्रहाचाही यात समावेश होता.
6.नौदलाच्या पश्चिम कमांडचे नवे कमांडर इन चीफ व्हॉईस ऍडमिरल आर.हरी.कृष्णा यांनी पदभार स्वीकारला.पश्चिम कमांडचे मावळते प्रमुख व्हॉईस ऍडमिरल अजित कुमार यांना निरोप देण्यात आला ते सेवेतून निवृत्त झाले आहेत.
7.बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने 400 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मंजुरी
8.महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला .संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या हत्या व बलात्काराचे आरोप होत आहेत.
9.युक्रेनिअन रेसलर्स आणि क्रोचेस स्मृती स्पर्धेत विश्व चॅम्पियन असणाऱ्या व्ही. कालादजींकसी हिला हरवत भारतीय मल्ल विनेश फोगटने सुवर्ण पदक पटकावले.
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks






No comments:
Post a Comment