१.गेल्या काही वर्षांमध्ये देशातील कैद्यांच्या संखेत वाढ होत असल्याचे इंडिया जस्टीस अहवालाद्वारे समोर आले आहे.न्यायालयाने शिक्षा न सुनावलेल्या म्हणजे विचाराधीन कैद्यांच्या संखेत वाढ नोंदवण्यात आली आहे.
२.सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून भारत सरकारने आयपीएस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.यापूर्वी हंगामी संचालक म्हणून आर .के.शुक्ला पदभार सांभाळत होते .
3.(बिएफाय )भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अजय सिंग यांचा विजय झाला .अजय सिंग spicejet कंपनीचे मालक आहेत.
![]() |
| अजय सिंग |
*अंतरराष्ट्रीय -
१.म्यानमारमध्ये लष्कराने कारभाराची सूत्रे हाती घेत लोकशाही बरखास्त करत लष्करशाही लागू केली आहे.एक वर्षाने होणाऱ्या निवडणुकीद्वारे राष्ट्राध्यक्ष निवड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
२.तमिम इक़्बाल या बांगलादेशच्या क्रिकेटपटू ने रचला नवीन विश्वविक्रम -क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये नेतृत्व करताना सर्वाधिक रन्स करणारा एकमेव फलंदाज बनला आहे.
3.amazon या कंपनीचे ceo म्हणून आता अँडी जेस्सी कारभार पाहणार.कंपनीचे सध्याचे CEO व जगातील श्रीमंतापैकी एक असणारे जेफ बेजोस आता कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहेत व अंतरीक्ष मोहीम,पत्रकारिता तसेच कंपनीचे आर्थिक फंड इत्यादीकडे लक्ष पुरवणार आहेत.
४.भारत आता सर्वात जास्त वेगाने कोविड १९ व्हायरस चे लसीकरण करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे.सर्वात जास्त वेगाने आतापर्यंत ४ मिलिअन लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे .
५.लोकशाही निर्देशांक (DEMOCRACY INDEX)मध्ये भारताला ५३ वे स्थान मिळाले आहे.हा निर्देशांक जगातील देशांमधील लोकशाहीचे मूल्यमापन करण्याकरिता वापरला जातो .लोकशाही निर्देशांक हा जागतिक बँकेच्या EKONOMIST INTELIGENCE UNIT द्वारे ठरवण्यात येतो .
6.दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर अमेरिकेने पहिल्यांदाच आपले मत मांडले.पत्रक काढत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की,शांततापूर्ण आंदोलन करने हे लोकशाहीचे लक्षण आहे तसेच दिल्लीतल्या आंदोलन कर्त्याना इंटरनेट सुविधा पुरवायला हवी असे मत मांडण्यात आले आहे.
*राज्य
१.फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली .कोरोनामुळे येत्या ५ मार्चपर्यंत ५० टक्के उपस्थिती वर्ग चालविण्यात येणार आहेत .
2.महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा पदाचा राजीनामा .



No comments:
Post a Comment